माझ्या ब्लॉगवर तुमचं मनापासून स्वागत.........
![]() |
बालाजी पवार |
नमस्कार.......
बाळराजे पाटील समर्थक-बालाजी पवार नावाचा इंटरनेटवर ब्लॉग सुरु करावा आणि त्यावर मी काही लिहावे इतका काही मी मोठा नाही. माझ्या या लिखाणातून फार मोठे सामाजिक परिवर्तन घडावे, असेही नाही. पण, तरीही मला हे करावेसे वाटले कारण विचारांची देवाणघेवाणच माणसाचं वैचारिक विश्व समृध्द बनवत असते.
माझा जन्म 13 जाने 1992 रोजी महाराष्ट्रात सोलपुर जिल्ह्यातील आणि मोहोळ तालुक्यातील अनगर या गावी झाला.यापेक्षा त्यात फार वेगळे लक्षात रहावे असं काही नाही. माझे वडिल नानासाहेब विठ्ल पवार आणि आई सौ. उषा हे दोघेही अतिशय उत्तम गृहस्थी आहेत. सर्वसामान्य अशाच पध्दतीने माझे बालपण होते. प्राथमिक शिक्षण जि.प.प्रा.शाळा अबुथळवस्ती अनगर आणि माध्यमिक शिक्षण कै.शं.बा.पाटील हायस्कूल अनगर येथे झाले. दहावीनंतर बाबुराव पाटील कृषि तंत्र विद्यालय अनगर येथे मी कृषि
डिप्लोमाची पदविका घेतली.तसेच सुरुवातीपासुन कॉम्प्युटर चालवायची आवड (इथे कॉम्प्युटर चालवणे हे ’गाडी चालवणे’ ह्या अर्थीच घेणे, कारण सुरुवातीला तेवढीच अक्कल होती). हळु हळु मित्र-मंडळींच्या सहवासात राहुन आणि माझ्यात असलेल्या असंख्य वळवळणाऱ्या किड्यांच्या मदतीने कॉम्प्युटर शिकत गेलो. वेबसाईट डिझाईनिंग/डेव्हलपींगचे अधिकृत शिक्षण कुठेही घेतलेले नाही. सध्या करत असलेल्या नोकरीतील कामाचा एक भाग असल्याने तेही शिकणे भाग पडले. अनेक उदार स्वभावाच्या तज्ञ मित्रांच्या कृपेने झालेले ते ई-शिक्षण. ऑनलाईन पैसे कमविण्याविषयी पहिल्यापासुन आवड, पण त्यापाई केलेल्या वायफळ प्रयत्नांपोटी गेलेली वेळ आणि अक्षरश: सांडलेला पैसा; यामुळे भरपुर अनुभवाची साठवण. पण कॉम्प्युटरशी संबंधित काहिही शिकण्याची आवड, भले ते आवाक्यातील असो किंवा नसो. विशेषत: "गुगल" ह्या शोधप्रणालीवर विशेष प्रेम. "गुगल" विषयी समजायला अनेक प्रकारचे आवश्यक आणि अनावश्यक शोध (सर्च) करण्यापासून ते कॉम्प्युटर मधील बारकावे शिकण्यापर्यंत अनेक वेळ खर्ची.
गुगल मधील पुढील घटकांचा प्रत्यक्ष वापर आणि
विशेष अभ्यास:
- "गुगल साईट्स" (Google Sites)
- "गुगल अर्थ" (Google Earth)
- "गुगल बिझनेस डिरेक्टरी" (Google Business Directory)
- "गुगल ट्रान्स्लेटर" (Google Translator)
- "गुगल ऍडसेन्स" (Google Adsense)
- "गुगल ऍडवर्ड्स" (Google Adwords)
- ऑरकुट (Orkut)
- "गुगल ऍपलेट्स" (Google Applets)
- "गुगल मेल इन्साईट्स" (Google Mail insights)
- "गुगल साईट्स" (Google Sites)
- "गुगल वेबमास्टर्स" (Google Webmasters),
- "गुगल ऍनालिटिक्स" (Google Analytics)
- "गुगल ऍफिलिएट्स" (Google Affiliates)
- "गुगल कोड" (Google Code),
- "गुगल लॅब्स" (Google Labs),
- "गुगल ऍलर्ट्स" (Google Alerts)
- "गुगल बुक्स" (Google Books)
- "गुगल इमेजेस" (Google Images)
- "गुगल न्युज" (Google News)
- "गुगल वेब-टुलकिट" (Google Web-toolkit)
- "गुगल शॉर्टकट्स" (Google Shortcuts)
- "पिकासा" (Picassa)
- "गुगल मॅप्स" (Google Maps)
- "गुगल कॅलेंडर" (Google Calender)
- "गुगल डॉक्स" (Google Docs)
याशिवाय कॉम्प्युटर दुरुस्ती आणि
प्रशिक्षणाचाही अनुभव (त्याचे
सर्टिफिकेट नाही, पण माहिती खरी आहे. प्रश्न विचारुन पडताळून बघु शकता)
इतर ज्ञान:
- कॉम्प्युटर टायपिंग: मराठी: ७० ते ८० शब्द प्रति मिनिट, इंग्रजी: १२० शब्द प्रति मिनिट.
- कॉम्प्युटर दुरुस्ती
- वेबसाईट डिझाईनिंग/डेव्हलपिंग: PHP, HTML, JOOMLA, FLASH, Website Domain Hosting, cPanel, Fantastico Deluxe, MX Configuration, CNAME records, MySQL, Wamp Server ह्याविषयी माहिती.
- एफ.टी.पी.
- ऍडोब ड्रिमव्हीवर, ऍडोब फ्लॅश, कोरेल ड्रॉ.
- सी.एम.एस.: जुमला (Joomla), द्रुपाल (Drupal), वर्डप्रेस (Wordpress).
- मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे सर्व प्रॉडक्ट्स: एक्सेल, वर्ड, पॉवरपॉईंट, वन नोट, आऊटलुक, शेआरपॉईंट वर्कस्पेस, पब्लिशर इत्यादी.
- फेसबुक पेजेस, ग्रुप मेंटेनन्स.
तासनतास कॉम्प्युटर शी खेळणे, पोहणे,
चित्रपट पाहणे, गुगल वर नवनविन प्रकारचे सर्च करणे, फेसबुक सारख्या ठिकाणी
नविन मित्र शोधणे.
असं माझं हे आयुष्य.... अनेक चढउतारांचं आणि वळवळणाचं....... खूप काही हिरावून घेऊन गेलेलं पण त्यापेक्षा कितीतरी देऊन गेलंलं. आर्थिकदृष्ट्या समृध्दी नसली तरी मनाची श्रीमंती आणि विचारांची प्रगल्भता देऊन गेलेलं. जगण्याचा खरा अर्थ उमगला नसला तरी जे जगलो त्याचा पश्चात्ताप करावा, असंही वाटलं नाही. म्हणूनच असामी नाही पण ........ नक्कीच असा मी.......................!!!
बालाजी पवार
तुमचा मित्र... अगदी हक्काचा.......